शिरूर नगरपरिषद हद्दीतील सर्वे नंबर ३२७/३२८ मधील गौण खनिज उत्खनन प्रकरणात महसूल अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. आता या जमिनीचा आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. भारतीय सैन्यदलात दोन पिढ्या देशसेवा करणारे माजी सैनिक रावसाहेब आदक यांची जमीन बेकायदेशीर दस्तऐवज तयार करून प्रेमराज फुलपगर यांनी बळकावल्याचे उघड झाले आहे.
माजी सैनिक रावसाहेब आदक यांच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा करून प्रेमराज फुलपगर यांनी ती विनित बोरा व अनिल नहार यांना विकसन करारनाम्याद्वारे दिली आहे. सदर प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या न्यायालयात सुनावणी झाली असून न्यायालयाने हा निर्णय माजी सैनिकांच्या बाजूने दिला आहे. मात्र, तरीही प्रत्यक्षात अद्याप कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही.
ही बाब लक्षात येताच माजी सैनिक रावसाहेब आदक यांनी महसूल मंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. भारतीय सीमांवर आपल्या प्राणांची पर्वा न करता देशसेवा करणाऱ्या आदक कुटुंबावरच अन्याय होणे हे दुर्दैवी आणि लाजिरवाणे आहे. प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करून न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
माजी सैनिकाच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा – प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अन्याय!
Reviewed by mohammad shaikh
on
March 31, 2025
Rating: 5