Breaking News

गाडी लावण्यावरुन घरात घुसून मारहाण सहा जणांच्या टोळक्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल, निमोणे येथील प्रकार

 

प्रदिप रासकर


निमगाव भोगी :निमोणे ता. शिरुर येथे घराशेजारी मोकळ्या जागेमध्य कार लावल्याच्या वादातून एका इसमासह पाच महिलांनी घरात घुसून एका इसमाला जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे किशोर बाबुराव पतके, पूजा किशोर पतके, सानिका किशोर पतके, सविता जगदाळे,  सविता संजय कदम, लीलाबाई रावसाहेब मोतीमोड यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत देविदास राधुजी पोटे (वय ५६ वर्षे रा. निमोणे ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी किशोर बाबुराव पतके, पूजा किशोर पतके, सानिका किशोर पतके, सविता जगदाळे, सविता जगदाळे, सविता संजय कदम, लीलाबाई रावसाहेब मोतीमोड (सर्व रा. निमोणे ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून निमोणे ता. शिरुर येथील देविदास पोटे हे घरात असताना शेजारील किशोर पतके यांसह काही महिला देविदास यांच्या घरात आल्या त्यांनी देविदास यांना दमदाटी करत किशोर यांनी तुझ्या मुलाला सांग तो आमच्या घराच्या शेजारील मोकळ्या जागेमध्ये गाडी का लावतो येथे गाडी लावायची नाही नाहीतर सोडणार नाही असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करु लागले, तुमचा मुलगा वकील असला तरी माझा जावई आत्ताच जेल मधून आलाय त्याला संपवायला वेळ लागणार नाही, यावेळी सविता जगदाळे यांनी तुमचा मुलगा माझ्या दारू विक्रीबाबत नेहमी पोलिसांत तक्रार करतो त्याला सांगा नाहीतर त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवू असे म्हणून सर्वांनी देविदास यांना जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी दिली, याबाबत देविदास राधुजी पोटे वय ५६ वर्षे रा. निमोणे ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी किशोर बाबुराव पतके, पूजा किशोर पतके, सानिका किशोर पतके,  सविता जगदाळे, सविता संजय कदम, लीलाबाई रावसाहेब मोतीमोड सर्व रा. निमोणे ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले हे करत आहे.