शाळेतील विद्यार्थिनींच्या पाण्याच्या बॉटलमध्ये विषारी औषध विषारी पाणी पिल्याने मुलीला त्रास... याबाबत अद्याप चौकशी नाही, मांडवगण फराटा येथील प्रकार
अक्षय टेमगिरे
या धक्कादायक प्रकारानंतर शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक मात्र यावर बोलण्यास तयार नाहीत. याबाबत या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन गुन्हा दाखल होणे गरजेचे होते परंतु अद्याप कुठल्याही प्रकारचा गुन्हा शाळेने व कुटुंबाने का दाखल केला नाही हा मात्र संशोधनाचा विषय असून यावर कोणाचा दबाव तर नाही ना अशी शंकाही उपस्थित होत आहे.
मांडवगण । फराटा येथील श्री वाघेशर विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनी दिनांक 15 ऑक्टोबर मंगळवार रोजी नेहमीप्रमाणे शाळेत आली होती त्यानंतर वर्गात दप्तर ठेवून ती बाहेर गेली व
शाळा भरल्यानंतर ती पुन्हा वर्गामध्ये आली तिने आणलेल्या बाटलीतील पाणी पिले असता तिला त्रास होऊ लागला. यावेळी तुझ्या शेजारील विद्यार्थ्यांनी बाटलीचा वास घेतला असता उग्रवास आल्याने विद्यार्थिनीला शंका आल्याने त्यांनीही बाब वर्ग शिक्षकांना सांगितली. वर्ग शिक्षकाने तातडीने विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल केली तेथे तिच्यावर उपचार सुरू झाल्याने वेळेत उपचार मिळाल्याने तिचे प्राण वाचले आहे.
डॉक्टरांनी बाटलीतील पाण्याची तपासणी केली असता पाण्यात विषारी औषध असल्याचे निदर्शनास आले. घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, संबंधित मुलीच्या पाण्याच्या बाटलीत विषारी औषध कुणी टाकले, याचा पोलिसांनी शोध घेणे गरजेचे आहे परंतु त्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक किंवा पालकांनी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करणे गरजेचे असले तरी मुलीवर जर विष प्रयोग झाला असेल व ती रुग्णालयात दाखल झाली असेल तिथे तिच्यावर उपचार झाले असतील तर याबाबत रुग्णालयाने पोलिसांना कळवलेच पाहिजे रुग्णालयाने ही बाब जर पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली नसेल तर ही गंभीर गोष्ट आहे.
ही घटना घडून आज चार दिवस झाले असून याबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार मांडवगण फराटा पोहोचला नसल्याचे समजते. श्री वाघेशर विद्यालयाचे
प्रशासन याबाबत कोणाला पाठीशी घालत आहे उद्या त्या मुलीचे काही बरे वाईट झाले असते तर त्याला जबाबदार कोण? अशी घटना पुन्हा जर शाळेत घडली तर त्याला जबाबदार कोण? हेही महत्त्वाचे आहे.
तर श्री वाघेश्वर विद्यालय मांडवगण फराटा येथील शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे परंतु हे कॅमेरे बंद असल्याचे समजते. नक्की मुलीच्या पिण्याच्या पाण्याच्या बॉटलमध्ये विषारी औषध आले कुठून याबाबत सर्वजण गप्प का आहेत.
याबाबत पोलीस प्रशासन कारवाई करणार का ? याकडे संपूर्ण मांडवगण फराटा व पंचक्रोशी चे लक्ष लागून राहिले असून या घटनेमुळे या भागात विद्यार्थिनी विद्यार्थी सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे.
अशाच प्रकारची घटना काही दिवसापूर्वी बाभुळसर परिसरात झाल्याची चर्चा असून तोही प्रकार स्थानिकांनी दाबला असल्याचे समजते.
या दोन्ही घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी गुन्हा दाखल नसला तरी देणे गरजेचे आहे.
विद्यालयात विद्यार्थिनीच्या संदर्भात विषबाधेचा प्रकार खरा असून,
आम्हाला समजताच आम्ही तातडीने विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल
करून तिचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केले आहे तर विद्यालयाच्या
वतीने या प्रकरणाची दखल घेतली आहे. शिरूर पोलिसांना (मांडवगण
पोलीस आऊट पोस्ट) या प्रकरणाची सखोल चौकशी करावी याबाबतचे
पत्र विद्यालयाच्या वतीने देण्यात आले आहे.
रामदास चव्हाण मुख्याध्यापक श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशाला मांडवगण
फराटा