स्वराज्य राष्टनिर्माण सेना पक्षातर्फे राजेशसिंग ढेरंगे विधानसभा लढवणार.....
स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेना पक्षाध्यक्ष श्री राजेशसिंग ढेरंगे आगामी विधानसभा निवडणूक शिरूर विधानसभा मतदारसंघ लढवणार असल्याचे पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष देखील मैदानात उतरला असून त्या अनुषंगाने राज्यभरात जोरदार तयारी करत आहे. अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते यांनी दिली.राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यात 10 ते 20 नोव्हेंबर दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुका पार पडतील अशी प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे.