मोक्का प्रकरणात आरोपी निर्दोष मुक्त – न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
पुणे, 27 मार्च 2025 – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत दाखल गंभीर गुन्ह्यात ११ मार्च रोजी मोक्का विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव कोर्टाने आरोपी आकाश शिंगारे उर्फ बाबा, रोहित जुजगर, दिनेश कोळी, संग्राम पवार निर्दोष मुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. पुराव्यांच्या अभावामुळे आणि तपासातील त्रुटींमुळे न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
पिंपरी चिंचवड आयुक्तालया अंतर्गत असणारे चिखली पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हेगारी टोळीशी संबंध आणि जबरी खंडणीसह इतर गंभीर आरोप लावले होते. तथापि, बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयासमोर पुराव्यांचे सखोल विश्लेषण सादर करून तपासातील असंख्य त्रुटी दाखवून दिल्या.
न्यायालयाच्या निरीक्षणानुसार:
आरोपीविरुद्ध कोणताही थेट पुरावा उपलब्ध नव्हता.
मोक्का अंतर्गत आवश्यक असलेली संघटित गुन्हेगारीची अट पूर्ण होत नसल्याचे सिद्ध झाले.
या सर्व बाबी लक्षात घेता, न्यायालयाने आरोपीला निर्दोष मुक्त करण्याचा आदेश दिला.
निर्णयानंतर आरोपीच्या कुटुंबीयांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला आणि हा सत्याचा विजय असल्याचे सांगितले. बचाव पक्षाचे ॲड. मोहम्मद शेख वकील म्हणाले, "मोक्का सारख्या गुन्ह्यांत निष्पाप लोक अडकवले जाण्याचे प्रकार वाढले आहेत. आजचा निकाल हा अशा अन्यायाविरुद्ध एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे बचाव पक्षाचे वकील ॲड. मोहम्मद शेख यांनी व्यक्त केले "