Breaking News

मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवारांचे सुचक विधान...


 ऍड.हमीद शेख 

पुणे: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटापाचा तिढा कायम असतांना महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून चढाओढ सुरु आहे.

अशातच राष्ट्रवादी पक्ष (शरद पवार गट) सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण असेल याची अप्रत्यक्षपणे घोषणा केली आहे. शरद पवार यांनी एकनिष्ठ अश्या बड्या नेत्याचे नाव जाहीर केले आहे. 

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत शरद पवार यांनी मोठं सूचक विधान केलंय.. जयंत पाटील यांनी उद्याचा महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी घ्यावी असं विधान शरद पवार यांनी केलंय. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सांगलीतल्या सांगता सभेत शरद पवार बोलत होते. उद्याचा महाराष्ट्र सावरण्यासाठी आणि प्रगती घडवण्यासाठी मोलाची कामगिरी याच परिसरातून होणार आहे असं शरद पवारांनी सांगलीच्या सभेत जाहीर केलंय. त्यामुळे जयंत पाटील हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत का याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झालीय..