Breaking News

भारत मातेची सेवा करून आलेल्या निमगाव म्हाळुंगी येथील सैनिकांनी जय जवान माजी सैनिक संघटनेच्या माद्यमातून अपघातग्रस्त कुटुंबाला 65000 हजाराची मदत देऊन जपला माणुसकीचा झरा

 



अक्षय टेमगिरे

रांजणगाव गणपती:निमगाव म्हाळुंगी येथील गरीब कुटुंबातील आणि मोलमजुरी करून पोट भरणारे विजय ज्ञानोबा धोत्रे यांच्या दोन मुलींचा अपघात निमगाव म्हाळुंगी - तळेगाव ढमढेरे रस्त्यावर झाला होता.

मोठया प्रमाणावर वाढलेल्या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला असल्यामुळे त्या ठिकाणी अपघात झाल्याने




या घटनेत त्यांच्या दोन्हीही मुली जखमी झाल्या होत्या परंतु त्यातील एक मुलगी गंबीर जखमी झाली असल्याने त्यांच्या कुटुंबियांच्या पुढे मोठा पेच निर्माण झाला होता. यावेळी जय जवान माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुभेदार रामचंद्र विधाटे आणि सचिव सुभेदार चंद्रकांत चव्हाण यांनी विजय धोत्रे यांना व त्यांच्या कुटुंबियांना फोन  करून तुम्हाला  आर्थिक मदत आम्ही सर्व माजी सैनिक करणार आहोत त्यामुळे तुम्ही चिंता करू नका अशा स्वरुपाचा आधार दिल्याने धोत्रे कुटुंबियांना सर्व माजी सैनिकांचा आदर वाटला.



आज शुक्रवार दि. 18 ऑक्टोबर रोजी  जय जवान माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुभेदार रामचंद्र विधाटे ,माजी सैनिक संघटनेचे सचिव सुभेदार चंद्रकांत चव्हाण आणि सर्व आजी माजी सैनिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि निमगाव म्हाळुंगी चे आदर्श होतकरू सरपंच श्री बापूसाहेब काळे यांच्या शुभहस्ते धोत्रे कुटुंबातील विजय धोत्रे,सुरेखा धोत्रे, भावना दौंडकर यांच्या कडे एकूण 65 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला यावेळी धोत्रे कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य निर्माण करण्याचे काम आज खऱ्या अर्थाने या माजी सैनिकांनी केले असून  यावेळी धोत्रे कुटुंबातील विजय धोत्रे व त्यांच्या कुटुंबियांनी  सैनिक संघटनेच्या सर्व माजी सैनिकांचे व  संघटनेचे अध्यक्ष सुभेदार रामचंद्र विधाटे आणि सचिव सुभेदार चंद्रकांत चव्हाण व निमगाव म्हाळुंगी चे सरपंच श्री बापूसाहेब काळे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले.


निमगाव म्हाळुंगी चे सरपंच श्री बापूसाहेब काळे यांनी बोलताना सांगितले की


आमच्या निमगाव म्हाळुंगीतील सैनिक, भारतमातेची प्रामाणिक सेवा करून सैन्य दलातून निवृत्त झालेत.परंतु गावातील सैनिक सेवा निवृत्त होऊन सुद्धा जय जवान माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून समाजामध्ये सामाजिक, धार्मिक कार्य मोठया प्रमाणावर करून समाजामध्ये एक सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य या संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र विधाटे आणि सचिव सुभेदार चंद्रकांत चव्हाण यांच्या नेतृत्वा खाली घडत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कि सैनिकांचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या निमगाव म्हाळुंगी गावचा सरपंच म्हणून मी काम पाहत आहे.


 अशा शब्दात सरपंच श्री बापूसाहेब काळे यांनी जय जवान माजी सैनिक संघटनेचे कौतुक केले .




सदर मुलींचा अपघात घडलेल्या ठिकाणी वेळोवेळी अपघात घडत असतात मागील 2 वर्षांपूर्वी याचं ठिकाणी दोन तरुणांला अपघातात. आपला जीव गमवावा लागला आहे तर काहीजण जखमी सुद्धा झालेले आहे त्यामुळे वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम खात्याला पत्रव्यवहार करून सुद्धा सार्वजनिक बांधकाम खात्याने याची दखल घेतली नसल्याने  सार्वजनिक बांधकाम खात्याचा  सरपंच बापूसाहेब काळे यांनी निषेध व्यक्त करून लवकरात लवकर सदर रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी सरपंच बापूसाहेब काळे यांनी केली आहे.



यावेळी जय जवान माजी सैनिक संघटनेचे सुभेदार बाळासाहेब घोलप, हवालदार लक्ष्मण शिंदे, हवालदार मारुती चौधरी, हवालदार अंकुश काळे, हवालदार लक्ष्मण कुसाळे,हवालदार आनंदा पवार, हवालदार सुनील चव्हाण, हवालदार बाबा मराठे, हवालदार संजय पाटील तसेच मोठया प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते.